म्हाडाच्या १ हजार घरांची लॉटरी येणार
म्हाडाच्या या वर्षीच्या लॉटरीत सुमारे एक हजार घरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे बोललं जातंय.
मुंबई : म्हाडाच्या या वर्षीच्या लॉटरीत सुमारे एक हजार घरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे बोललं जातंय. गेल्या वर्षीच्या लॉटरीत घरांची संख्या कमी होती आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी एकही घर नव्हतं. त्यामुळे म्हाडावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे यंदाच्या लॉटरीत घरांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे बोललं जातंय. यंदा आर्थिक दुर्बल घटकांसाठी 400 घरं असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
म्हाडाच्या घरांची किंमत पुन्हा वाढेल का?
म्हाडाची ही लॉटरी सर्वसाधारणपणे मे महिन्यात निघते. मात्र सध्या राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असल्याने लॉटरी लांबण्याची शक्यता वर्तवली जातेय.
म्हाडाच्या घरांची किंमत किती असेल याकडेही लोकांचे लक्ष असेल, कारण मागील काही वर्षापासून म्हाडाच्या घरांची किंमत मोठ्य़ा प्रमाणात वाढवण्यात आली आहे. यावरही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे, पण या वर्षी म्हाडाच्या घराच्या किंमती किती असतील हे लॉटरी जाहीर केल्यानंतरच समजणार आहे.