`ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पायाही पडेन`
ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पायाही पडेन, असं विधान पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय.
मुंबई : ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पायाही पडेन, असं विधान पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय. पुण्यामध्ये ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे जानकरांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असं भाकितही केलं.
'एक ब्राह्मण लाखापेक्षा मोठा' अशी नवी घोषणाही जानकरांनी यावेळी केली. ज्यांना ब्राह्मणांचा स्पर्श होतो ते इतिहास घडवतात असं सांगताना महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक ब्राम्हण होते, महात्मा फुले यांना शाळेसाठी जागा देणारे भिडेदेखील ब्राह्मणच होते, असं जानकर म्हणाले.