Maharshtra Politics : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. यानंतर सर्वच पक्षांचं लक्ष असेल ते लोकसभा निवडणुकांवर. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)  सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shivsena UBT) लोकसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लान तयार केलाय. याची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षातील आपल्या 10 शिलेदारांवर सोपवली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून सुरू होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौरा आणि जाहीर सभांचे नियोजन सुद्धा लवकर जाहीर केलं जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विभागीय नेत्यांची यादी जाहीर
महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर (Organizational Structure) भर देण्यासाठी शिवसेनेने आज विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी 'नेते' मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवत आता नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल टाकण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र ,कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी 10 नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.


या दहा शिलेदारांवर जबाबदारी
संजय राऊत यांच्यावर उत्तर महाराष्ट्रासह, नगर, शिर्डी, पुणे, मावळची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अरविंद सावंत पश्चिम विदर्भ, तर भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिल देसाई पश्चिम महाराष्ट्र, राजन विचारे ठाणे-पालघर, चंद्रकांत खैरे, रवींद्र वायकर, सुनील प्रभू यांच्याकडे मराठवाडा तर अनंत गीते, विनायक राऊत यांच्याकडे कोकणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर जानेवारी महिन्यात होणार आहे. या जानेवारी महिन्यात जाहीर सभा उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन सुद्धा लवकरच जाहीर केलं जाणार आहे


कोणत्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
संजय राऊत-
उत्तर महाराष्ट्र आणि पुणे
लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिडीं, पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी, चिंचवड, मावळ)


अनंत गीते
कोकण (रायगड)
लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा - पनवेल, कर्जत, उरण)


चंद्रकांत खैरे
मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना


खासदार अरविंद सावंत
पश्चिम विदर्भ
लोकसभा मतदारसंघ बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ - वाशिम, वर्धा


खासदार अनिल देसाई
पश्चिम महाराष्ट्र
लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी


आमदार भास्कर जाधव
पूर्व विदर्भ
लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर


खासदार विनायक राऊत
कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी, सिंधुदुर्ग


खासदार राजन विचारे
कोकण (ठाणे, पालघर)
लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर


आमदार रवींद्र वायकर
मराठवाडा
लोकसभा मतदारसंघ नांदेड, हिंगोली, परभणी


आमदार सुनील प्रभू 
मराठवाडा, सोलापूर 
लोकसभा मतदारसंघ सोलापूर ,धाराशिव, लातूर, बीड