Maharashta Assembly : महाराष्ट्राच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आजही चौफेर फटकेबाजी केली. आपल्या भाषणात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना जोरदार टोले लगावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्विकारली. कोणाला वाटलंही नव्हतं की असं काही घडेल, देवेंद्र फडणवीसांना आपल्या भाषणात उल्लेख केला की एक शिवसैनिक, पण का सारखं सांगावं लागतं. ते जर शिवसैनिक आहेत तर सतत तेच सांगण्याची वेळ का येते, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनला शपथ घेतली. गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी तुम्हाला 4 जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार आज तुम्ही बहुमताचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. 


देवेंद्र फडणवीस तुम्ही भाषणात इतकं एकनाथ शिंदे यांचं समर्थन करत होतात, मग मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात जे होते, त्या वेळेस फक्त रस्ते महाविकास महामंडळच त्यांना का दिलं. ते एवढं कर्तृत्वावान होते, चंद्रकांत पाटील तुम्हाला माहिती आहे असं सांगत त्यांनाही टोला लगावला. 


सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे वन, वित्त आणि नियोजन, महसूल, कृषी सहकार खाती होती. जर आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तुम्ही सांगताय तसे सर्वगुण संपन्न आणि पात्रता होती, तर त्यांना एक छोटसं रस्ता विकास महामंडळ का दिलं, त्यात त्यांचा जनतेशी संबंधच नव्हता फक्त हायवे करायचे, समृद्धी महामार्ग, टनेल करायचे इतकंच होत, तुम्हाला तेव्हा का नाही वाटलं की चला माझं एखादं खातं त्यांना देतो, याचाही विचार झाला पाहिजे असा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.