मुंबई : मुख्यमंत्री कोणाचा होणार ? जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार यावरून राज्यातील राजकारण सध्या तापले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता मोठा भाऊ कोण ? यावरून शिवसेना भाजपामध्ये खलबत सुरु आहेत. समान जागावाटपाची चर्चा झाली नव्हती असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर व्हिडीओ सहीत स्पष्टीकरण दिेले आहे. आता दोन्ही पक्ष अपक्षांच्या पाठींबा घेत आपले संख्याबळ वाढवत आहेत. यामध्ये शिवसेनेने अपक्षांचा षटकार मारला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा आणि शिवेसेन साक्री विधनसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा मिळाला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र त्यांनी दिले. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मंजुळा गावीत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 



मंजुळा गावीत ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांचा ७ हजार मतांनी पराभव केला. आता शिवसेनेचे संख्याबळ ६२ वर पोहोचले आहे.