Ajay Choudhary Meet Sudhir Salvi: शिवडी मतदारसंघ हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चा बालेकिल्ला मानला जातो. खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांचा हाच मतदारसंघ आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 40 आमदार ठाकरेंची साथ सोडून गेले पण हे नेते ठाकरेंसोबत राहिले त्यातले एक आमदार हे शिवडी मतदार संघातून येतात. त्यांच्या याच निष्ठेची पोचपावती म्हणून उद्धल ठाकरे यांनी अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली.दरम्यान ठाकरेंना सुधीर साळवी यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. सुधीर साळवी यांना आमदारकीची उमेदवारी मिळावी, अशी इच्छा शिवडी मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. साळवींना उमेदवारी न मिळाल्याने हजारो कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान शिवडी विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी विधानसभा संघटक सुधीर साळवी यांची भेट घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजय चौधकी आंनी लालबाग येथील सुधीर साळवी यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.  शिवडी विधानसभेतुन सुधीर साळवी देखील ठाकरे गटाकडून इच्छुक होते मात्र अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सुधीर साळवी आणि समर्थक नाराज झाले होतेय त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना मातोश्रीवर बोलावून समजूत काढली होती. सुधीर साळवी यांनी अपक्ष उभे रहावे, आम्ही त्यांना निवडून देऊ आणि विजयाचा गुलाल मातोश्रीवर घेऊन येऊ, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांना भविष्यात महत्वाची जबाबदारी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सुधीर साळवी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. 


अजय चौधरी आज सुधीर साळवी यांच्या भेटीसाठी लालबाग येथील राहत्या घरी आले होते.उद्या अजय चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चौधरींनी सुधीर साळवींची भेट घेतली.


फॉर्म सुनेला आणि उमेदवारी सासऱ्याला


काल दुपारी मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दहिसर विधानसभा निवडणुकीसाठी घोसाळकर कुटुंबियांकडे पक्षाचा एबी फॉर्म सोपवला. हा फॉर्म घेताना सर्वात पुढे तेजस्वी घोसाळकर फोटोमध्ये दिसत आहेत. याच फोटोत तेजस्वी यांचे सासरे विनोद घोसाळकरही दिसत आहेत. विशेष म्हणजे पक्षाच्या अधिकृत हॅण्डलवरुन आधी तेजस्वी घोसाळकरांना एबी फॉर्म देण्यात आल्याची पोस्ट एक्सवर करण्यात आली. मात्र त्यानंतर सव्वा तासाने विनोद घोसाळकर हे अधिकृत उमेदवार असतील अशी पोस्ट करत पुन्हा फोटो एबी फॉर्म वाटल्याचे फोटो शेअर करण्यात आले. आज म्हणजेच 27 ऑक्टोबरच्या 'सामना'मधूनही विनोद घोसाळकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळेच एबी फॉर्म सुनेला आणि उमेदवारी सासऱ्याला असा काहीसा घोळ झाल्याचं चित्र या संभ्रमामुळे दिसत आहे.ठाकरेंच्या पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून विनोद घोसाळकर यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. असं असलं तरी अर्ज भरेपर्यंत काहीही होवू शकते असं म्हटलं जात आहे. खरं तर दहिसरमधून निडवणूक लढवण्यासाठी तेजस्वी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर हे दोघेही इच्छुक होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घोसाळकर कुटुंबाला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला. घोसाळकर कुटुंबाने कोणी लढायचं यावर निर्णय घ्यावा असं उद्धव ठाकरे यांनी तेजस्वी आणि विनोद घोसाळकरांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर वरून तसंच इन्स्टावरून तेजस्वी घोसाळकर यांना पक्ष प्रमुखांनी एबी फॉर्म दिला असं जाहीर करण्यात आलं होते. तशा बातम्याही प्रसारमाध्यमांनी चालवल्या. मात्र आज पक्षाच्या मुखपत्रातून विनोद घोसाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने उमेदवारीवरुन संभ्रम निर्माण झाला आहे.