शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ.. कुर्ला-नेहरुनगर आणि अंधेरीत दोन महत्त्वाच्या सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर झाली आहे. आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश.
दिवाळीचा आज पाचवा दिवस. सगळीकडे बहिण-भावाच्या नात्याचा सण भाऊबीज साजरी केली जात आहे. या सगळ्यातच आजपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला देखील सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसेनेची पहिली प्रचार सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे शिवसेनेची पहिली जाहीर प्रचार सभा संध्याकाळी शिवसेनेची पहिली प्रचार सभा कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी होणार आहे.
तर रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दूसरी सभा होणार आहे. अंधेरी पर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सभा घेणार आहेत.
मंगेश कुडाळकर
कुर्ला नेहरु नगर विधानसभा मतरदार संघात मंगेश कुडाळकर विरुद्ध प्रविणा मोरजकर अशी लढत असणार आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रविणा मोरजकर यांना उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळं कुर्ला विधानसभा निवडणुकीत प्रविणा मोरजकर विरुद्ध एकनाश शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मंगेश कुडाळकर यांच्यात लढत पाहायला मिळेल.
प्रविणा मोरजकर यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेच्या नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. शिवसेना पक्षात ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी मंगेश कुडाळकर यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता.
मुरजी पटेल
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून अंधेरी पूर्वची जागा रमेश लटके जिंकले. यानंतर त्यांचं निधन झाल्यावर उपनिवडणूक घेण्यात आले. यानंतर ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना समर्थन मिळालं. मात्र मुरजी पटेल यांना शेवटच्या क्षणी नाव मागे घेण्यास सांगितलं. ज्यामुळे ऋतुजा लटके या विजयी झाल्या.
अंधेरी पूर्व हा मतदारसंघ विझानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या जागेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभा घेणार आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघातील उमेदवार मुरजी पटेल हे भाजपचे आहेत. मात्र, निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज मुरजी पटेल यांच्यासाठी रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानातदुसरी सभा घेतली जाणार आहे.