मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला महाराष्ट्रव्यापी दौरा करणार आहेत.


मतदारसंघावर लक्ष केंद्रीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याआधी पक्षाचे निरीक्षक २८८ विधानसभा मतदार संघाचा दौरा करून मनसेच्या सद्यस्थितीची माहिती घेतील. निरीक्षकांकडून आलेल्या अहवालानुसार मनसेसाठी पोषक वातावरण असलेल्या १५० ते १७० मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे.


पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना


राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी रवींद्र नाट्यगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी राज यांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या.