मुंबई : Maharashtra Assembly Speaker Election : आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक तिन्ही पक्षाकडून तीन अर्ज भरण्यात येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. आघाडीने जेव्हा राज्यपालांना अनेकदा विनंती केली तेव्हा म्हणाले विधानसभा अध्यक्ष निवडणूक हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आताही प्रकरण न्यायालयात आहे, मग निवडणूक कशी घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला आहे. राज्यपालांची ही नीती संविधानाचा खून करणारी आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुपूर शर्मा च्या प्रकरणात न्यायालयाने भूमिका मांडली आहे. 2014 पासून संविधानाचा रोज खून होत आहे. सत्तेसाठी काहीपण अशी भाजपची भूमिका दिसून येत आहे. पुढचा काळ भाजपसाठी धोक्याची घंटा असेल. आमची लढाई न्यायालयीन आहे, असे नाना पटोले म्हणाले.


या सरकारमध्ये मुंबईही गुजरातमध्ये गेली तरी नवल वाटायला नको. बुलेट ट्रेन प्रकल्प त्यासाठीच आहे. मुंबईतील कारशेड कांजूरमध्ये व्हावी पण त्यातही केंद्राने आडकाठी आणली. मुंबईकरांचा श्वास रोखला जात आहे. सत्तेपायी जनतेचा विश्वासघात होत असून मुंबईकर याची शिक्षा त्यांना देईल, असा इशारा त्यांनी दिला.


आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडीबाबत चर्चा होणार आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर उमेदवार देण्यात आले आहेत. तुर्तास संख्याबळ महाविकास आघाडीकडे कमी आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक गट संख्या या जोरावर नार्वेकर यांचा विजय सुकर मानला जात आहे. आता महाविकास आघाडी नेमके कोणास उमेदवारी देणार हे पाहणे उत्सुकतेचं आहे. दरम्यान, तीन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी सुनील प्रभू , राष्ट्रवादी जयंत पाटील, धनंजय मुंडे विधानभवन येथे पोहोचले आहे.


दरम्यान, शिवसेना बंडखोर आमदार आज मुंबईत येणार आहेत. उद्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. त्यामुळे सर्व आमदार आज गोव्याहून मुंबईत येतील. सर्व आमदारांना अधिवेशनाआधी मुंबईत नरिमन पॉईंट इथल्या ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गोव्यात दाखल झालेत. पहाटे चार वाजता ते गोव्यात दाखल झाले. आज सर्व आमदार गोव्याहून मुख्यमंत्र्यांसह मुंबईत परतणार आहेत.