Sanjay Raut On Jahir Sabha Interview: आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे शिवसेना नेते संजय राऊत नुकतेच झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेनेत बंडखोरी, तुरुंगातील अनुभव, आगामी पुस्तक या सर्व प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली. तुरुंगातील अनुभवांवर मी एक पुस्तक लिहितोय, असे संजय राऊतांनी यावेळी अनेक सांगितलेले आपण ऐकले असेल. नरकारतला स्वर्ग असे या पुस्तकाचे नाव आहे. पण तुरुगांत स्वर्ग कधी पाहायला मिळतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, 'तुरुंगातला अनुभव हा नरकच असतो. तेथे कधी काळोख होत नाही. प्रखर उजेडामध्ये तुम्हाला दिवस-रात्र काढायची असते. झोप येत नाही. हवं तसं अन्न, पाणी मिळत नाही. जगातल्या सर्व तुरुंगात हीच स्थिती असते. फार फार तर तुम्हाला पाण्याची बॉटल मिळाली तरी खूप हायसं वाटतं. मी कधी चहा पित नाही. पण त्यावेळी कोणी चहा विचारला तरी बर वाटायचं, असे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊतांच्या टिकेला विरोधी पक्षाकडून काही नेते उत्तर देतात. त्यांना राऊतांनी टोला लगावलाय.मला उत्तरे देऊन सर्व थकले. मला शिव्या घालणं किंवा पक्षप्रमुखांना शिव्या घालणं याला काऊंटर अटॅक म्हणत नाहीत. संजय राऊतांना पर्याय असूच शकत नाही. कोणीतरी यायला हवं मग मी निवृत्त होईन, असे ते म्हणाले.


असंविधानिक शब्दाचा वापर?


संजय राऊत असंविधानिक शब्द वापरतात, अशी टीका त्यांच्यावर वारंवार केली जाते. यावर त्यांनी भाष्य केले आहे. मी कोणताही असैविधानिक शब्द वापरत नाही. तुम्हाला तो वाटत असेल. मला तो वाटत नाही. ग्रेस, ढसाळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवी आहेत. त्यांचे साहित्य मी वाचलय. मी वापरलेल्या शब्दाचा वापर भारतातील अनेक लोक करतात. भारतातील संदर्भ ग्रंथात याचा अर्थ आहे. तुम्हाला तो शब्द मान्य नसेल तर त्या ग्रंथाचा तो अपमान असल्याचे ते म्हणाले. 


संध्याकाळी 7 च्या आत घरात 


मी सकाळी 4 ला काम करायला तयार असतो. पण 7 वाजले की मला घरी जायचं असतं. मला माझ्या आई, मुलगी, भाऊ, पत्नी सर्वांशी बोलायच असतं. मी तुरुंगात होतो तेव्हा या सर्वांनी घर संभाळलं. माझी मुलगी, पत्नी मला तोंडावर सांगतात, की तुमचं हे चुकलं, असे ते सांगतात असे ते म्हणाले. 


सध्या कोणता सिनेमा पाहिलाय या प्रश्नाला उत्तर देताना, 'एक नंबर सिनेमा पाहण्याचा प्रयत्न मी केल्याचे ते सांगतात. 'धर्मवीर 2' पाहा असं देखील कोणीतरी मला सांगितलं. पण 'जय भीम' सिनेमा मला खूप आवडल्याचे राऊतांनी सांगितले. 


आनंद दिघे असते तर...


आनंद दिघे असते तर बंड करणाऱ्यांना फोडून काढलं असतं, अशी टीका त्यांनी शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांवर केली. हे काय वासुदेव बळवंत फडके आहेत का? संयुक्त महाराष्ट्रावेळी बंड झालं, काँग्रेसमध्ये बंड झालं. पैसे घेऊन, ईडीच्या भीतीने पळालेल्यांना बंड म्हणता येणार नाही. भुजबळ, गणेश नाईक हे बाळासाहेब असताना शिवसेना सोडून गेले.  मी राज ठाकरेंना मानतो. कारण त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. त्यांनी शिंदेंसारखा दुसऱ्यांच्या पक्षावर दावा सांगितला नाही, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.  हे स्वत:च्या कामाला उठाव म्हणतात पण आता हे झोपतील, असेही ते म्हणाले. 


शिवसेना संयमी झाली का?


शिवसेना आधी आक्रमक होती ती आता संयमी झालीय का? असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना, 'शिवसेना आक्रमकच आहे. फक्त प्रश्न, पिढी बदलली आहे. बाळासाहेबांनी सतत संघर्ष केला. त्यावेळी हिंसाचार झाला. पण आधीचे प्रश्न आता राहिले नाहीत, असे ते म्हणाले.