Sanjay Raut ED Inquiry : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची आज सकाळी 7.30 वाजल्यापासून त्यांच्या भांडूपमधल्या घरी चौकशी सुरु होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तब्बल 9.30 तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सव्वासात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झालं होतं. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 10-12 ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल होऊन चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.


संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेणार
संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्याना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे, त्यामुळे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आलं आहे. इतर ईडी कार्यालयाबाहेर सीआरपीएफ तैनात करण्यात आलं आहे. 


काय आहे पत्राचाळ प्रकरण? 
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार
पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते
एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते
उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते
बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुसऱ्या बिल्डरला विकली