मुंबई : 10 वी च्या लेखी परीक्षेला आजपासून सुरवात होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी परीक्षेला एकूण १७ लाख  ५१ हजार ३५३ विद्यार्थी बसणार आहेत.  गेल्या वर्षी पेक्षा यंदाची विद्यार्थी संख्या तुलनेनं कमी आहे. पेपर सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्रांवर जॅमर बसवण्याचा विचार आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या परिक्षेसाठीही विद्यार्थ्यांनी परिक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे बंधनकारक आहे. ही माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. 


दहावीच्या विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर पोहाचावे


राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेची तसेच परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.  राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत येत्या १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. 


१७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षेस नोंदणी केली असून त्यात ९ लाख ७३ हजार १३४ मुले व ७ लाख ७८ हजार २१९ मुली आहेत. राज्यातील २१ हजार ९८६ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यात नियमित विद्यार्थी १६ लाख ३७ हजार ७८३ असून तर ६७ हजार ५६३ पुनर्परीक्षार्थी व ४६ हजार ७ इतर विद्यार्थी आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.