मुंबई :  महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहे. दरम्यान बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता, रोजगार देण्यासंदर्भात महत्त्वकांशी योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नियमती कर्ज भऱणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून, आज विधिमंडळात तो मांडला जाणारे. त्यामुळे आजच्या विधिमंडळ कामकाजाकडे सर्वांचच लक्ष लागलेलं असेल. 



आर्थिक अहवाल : रोजगार आणि उद्योग क्षेत्रात घसरण


राज्य सरकारकडून गुरुवारी विधिमंडळात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic survey 2019-20)  सादर  करण्यात आला. या अहवालानुसार उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे. तर आर्थिक मंदीमुळे राज्याचा जीडीपीही ७.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. गेल्यावर्षी कृषी क्षेत्राचा विकासदर उणे २.२ टक्के होता. यामध्ये यंदा ३.१ टक्क्यांची वाढ झाल्याने महाराष्ट्राला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.


तर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाणही जास्त असल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. २०१८-१९ या वर्षात महाराष्ट्रात ७३ लाख ५० हजार रोजगार उपलब्ध होते. गेल्या वर्षभरात यामध्ये घट होऊन रोजगाराचा आकडा ७२ लाख ३ हजारावर आला आहे. याचा अर्थ राज्यातील रोजगारात १ लाख ४७ हजारांची घट झाली आहे. गुजरातमध्ये हेच प्रमाण ४.१ टक्के आहे. तसेच दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हा देशात पाचव्या क्रमांकावर असल्याची बाब अहवालातून समोर आली आहे.