मुंबई : Maharashtra cabinet expansion : आताची सर्वात मोठी बातमी. राज्यात एक महिन्यापासून दोघांचे सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याची उत्सुकता आहे. तर विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका करत आहे. दरम्यान,  सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याचवेळी  पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेशन घ्यायच्या हालचाली सुरु आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या 7 दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून हिरवा कंदिल दिल्याचे सांगण्यात येतअसून 60:40च्या फॉर्म्युल्यानुसार खाते वाटप निश्चित असल्याचे बोलले जात आहे.


पुढील आठवड्यात पावासाळी अधिवेशन?


पुढील आठवड्यात पावसाळी अधिवेशन घ्यायच्या हालचाली सुरु आहेत.  9 ऑगस्टपासून मुंबईत पावसाळी विधानसभा अधिवेशन घेण्याबाबत संकेत मिळत आहेत. त्यामुळे मुंबईत हे अधिवेशन घेण्याबाबत विचारविनिमय सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशन आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरु आहेत.


सूत्रांची माहितीनुसार साधरण दोन आठवडे पावसाळी अधिवेशन ठेवाव, याचा विचार शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नंतर होत आहे. नव्या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. या आधी 25 जुलै पावसाळी अधिवेशन होणार होते, पण राज्सात सत्तांतर आणि कॅबिनेट विस्तार यामुळ अधिवेशन लांबणीवर गेले होते.