मुंबई : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 8 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ओमायक्रनॉचा सामना कसा करायचा, त्याला रोखण्यासलाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यासारख्या अनेक मह्त्तवाच्या मुद्द्यांवर  काही तासांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्ट फोर्स यांच्यात बैठक पार पडणार आहे. (maharashtra chief minister uddhav thackeray meeting with task force over to omicrone variant)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टास्ट फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात आज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह, वैदयकीय क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित असणार आहेत.



राज्यात ओमायक्रॉन हळूहळू हातपाय पसरतोय. याला रोखण्यासाठी तसाच याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय होतं, आणि काय महत्त्वाचे निर्णय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.  


देशात कुठे आणि किती ओमायक्रॉन रुग्ण? (Omicron India Cases)


महाराष्ट्र 


डोंबिवली - 1


पुणे - 1


पिंपरी चिंचवड - 6


कर्नाटक - 2 


गुजरात - 1


राजस्थान -9 


दिल्ली - 1


दरम्यान देशात ओमायक्रॉन या नव्या विषाणूने बाधित रुग्णांचा आकडा हा 21 वर पोहचलेला आहे.