दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अचानक विधानभवनाला (Vidhan Bhavan) भेट दिली आहे. मुख्यमंत्री आज (17 डिसेंबर) संध्याकाळी परिवहन मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यासह विधानभवनात दाखल झाले. विधान भवनाला भेट देण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडले. (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray visited Vidhan Bhavan on the backdrop of winter session with transport minister anil parab) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेटी मागचं कारण काय? 


येत्या 22 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांना फार न चालण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आता शस्त्रक्रियेला महिना झाला आहे.



त्यामुळे आपल्याला चालताना काही त्रास तर होत नाही ना, हे जाणून घेण्यासाठी ते विधान भवनाच्या मेन गेटपासून ते सभागृहापर्यंत चालत गेले. यावेळेस परिवहन मंत्रीही उपस्थित होते. यानंतर काही वेळ थांबल्यानंतर ते पुन्हा गाडीत बसून वर्षाच्या दिशेने निघाले. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांवर उपचार करणारे डॉक्टर काल विधानभवनात आले होते. मुख्यमंत्री विधानसभा सभागृहात चालत जाऊ शकतात का याचा अंदाज त्यांनी घेतला. 
 
महिन्यानंतर घराबाहेर


मुख्यमंत्र्यांवर 12 नोव्हेंबरला शस्त्रक्रिया झाली होती. यानतंर डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते शासकीय निवास असलेल्या वर्षावर परतले होते. मात्र यानंतर ते घराबाहेर पडले होते.