मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसंपर्क अभियान या विशेष सभेत विरोधकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्यातील विरोधकांवर आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांनी या सभेदरम्यान भाजपच्या नेत्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (maharashtra chief uddhav thackeray criticize to central government over to incresed security of kirit somaiya and navneet rana)


मुख्यमंत्री काय म्हणाले?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"यांना झेड प्लस सुरक्षा. टिनपाटांना सुरक्षा देत आहेत. तिथे काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही, पण इथं भोकं पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा देत आहेत. कोणाला वाय प्लस, कुणाला झेड प्लस. काय बापाचा माल आहे तुमच्या", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. 



"ज्यांना केंद्रीय सुरक्षा यंत्रणा पुरवताय तो लोकांचा पैसा आहे तो. ज्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे, त्यांना देत नाही. ही असली गळकी टिनपाटं काय उपयोगाची तुम्हाला. टिनपाट सभ्य शब्द बोललो, टमरेलच बोलायचं होतं", अशी खोचक टीकाही ठाकरेंनी यावेळेस केली.


"राहुल भट सांगत होते, माझी बदली करा, पण त्यांचं ऐकलं नाही. तिकडे काश्मिर पंडितांना सुरक्षा नाही इकडे भोकं पडलेल्या टिनपाटांना सुरक्षा देत आहेत", असंही मुख्यमंत्री म्हणाले.