Mumbai Air Pollution : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवेच्या दर्जाबाबत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने स्वत:च्या बाजूने सु-मोटो जनहित याचिका क्रमांक 3/2023 ची नोंद केली आहे. या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या विविध आदेशांचे पालन करून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमएमआर क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत आहे. बांधकाम हा नागरीकरणाचा एक प्रमुख भाग आहे, त्यासाठी रेडी मिक्स कंक्रीट प्लांट आवश्यक आहे. शहरात स्थित रेडी मिक्स कंक्रीट प्लांट हे वायू प्रदूषणाचे एक स्रोत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 7 नोव्हेंबर 2016 रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. रेडी मिक्स कंक्रीट प्लांटसाठी मार्गदर्शक तत्त्वे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू होती.


मुंबईतील प्रदूषण कमी करण्याच्या सूचना


अशातच आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 27 नोव्हेंबर 2024 रोजी रेडी मिक्स कंक्रीट प्लांट्सच्या मार्गदर्शक तत्त्वांबाबत अधिसूचना जारी केली आहे. जी महाराष्ट्र राज्यातील फक्त मुंबई महानगर क्षेत्रासाठी लागू असेल आणि अधिसूचना 7 नोव्हेंबर 2016 उर्वरित महाराष्ट्रासाठी लागू आहे. आवश्यक अनुपालनासाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2024च्या अधिसूचनेची प्रत जोडली आहे. सिद्धेश कदम यांनी मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच बैठक घेऊन त्यांनी मुंबईतील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी योग्य त्या सूचना देखील दिल्या आहेत.


सर्व प्रादेशिक अधिकारी आणि उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना देखील यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. 27 नोव्हेंबर 2024च्या उपरोक्त अधिसूचनेची अंमलबजावणी सुनिश्चित करावी आणि रेडी मिक्स कंक्रीट प्लांटची स्थापना आणि संचालनाबाबत आवश्यक कारवाईसाठी तुमच्या अधिकारक्षेत्रानुसार सर्व आरएमसी प्लांट्स, असोसिएशनशी संपर्क साधा. ही अधिसूचना जारी केल्याच्या तारखेपासून लागू आहे.