मुंबई : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) कहर सुरुच आहे. राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात बुधवारच्या तुलनेच किंचीत कमी रुग्ण आढळले आहेत. मात्र मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. (maharashtra corona update 13 january 2022 today 46 thousand 406 patients reported in state) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात गेल्या 24 तासात महाराष्ट्रात एकूण 46 हजार 406 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल बुधवारी 46 हजार 723 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 32 जण कोरोनामुळे दगावले होते. 


मुंबईतील कोरोनाचा आकडा


मुंबईत दिवसभरात एकूण 13 हजार 702 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण 20 हजार 849 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे झाल्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 36 दिवसांवर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  


ओमायक्रॉनचे किती रुग्ण?


दिलासादायक बाब अशी की राज्यात आज एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झालेली नाही. त्यामुळे राज्यासाठी हा किंचीतसा दिलासा आहे. राज्यात आजपर्यंतचा एकूण ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 1 हजार 367 इतका आहे. यापैकी अनेक जणांना यशस्वीरित्या ओमायक्रॉनवर मात केली आहे.