Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णसंख्येत मोठी वाढ, एकूण आकडा किती?
राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनासह (Maharashtra Corona Update) ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यासाठी काहीशी चिंताजनक बातमी आहे. एकाबाजूला मुबंईतली रुग्णसंख्या घटली असताना राज्यातल्या कोरोनासह (Maharashtra Corona Update) ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron Positive Patients) रुग्णांचा आकडाही वाढला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 44 हजार 388 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तब्बल 207 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. (maharashtra corona update 9 january 2022 today 44 thousnad 388 corona and 207 omicron patients found in state)
किती रुग्ण बरे?
राज्यात 24 तासांमध्ये 15 हजार 351 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा 94.98 टक्के इतका झालाय.
सक्रिय रुग्ण किती?
राज्यात ताज्या आकडेवारीनुसार, एकूण 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
किती जणांचा मृत्यू ?
राज्यात कोरोनामुळे 12 जण दगावले आहेत. यामुळे राज्याचा मृत्यू दर 2.04 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत किती रुग्ण?
मुंबईत गेल्या 24 तासात 19 हजार 474 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 63 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 85 टक्क्यांवर पोहचला आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 41 दिवसांवर आला आहे. तसेच कोरोनामुळे आज 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात कोरोनाचा स्फोट
पुण्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. शनिवार 8 जानेवारीच्या तुलनेत आज जवळपास 80 टक्के अधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात एकूण 4 हजार 29 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 688 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सांगतील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण
सांगली जिल्ह्यात आज ओमयक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यातील 207 पैकी सांगलीत 57 जणांना ओमायक्रॉन झाला आहे.