मुंबई : महाराष्ट्रातील गंभीर पूरपरिस्थितीचा फटका सुमारे ४० टक्के मतदारांना बसला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहितार्थ याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निर्णय येणार याकडे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यास पूरग्रस्तांसाठी सुरु असलेल्या मदतकार्यावर परिणाम होऊ शकतो. सध्या मदतकार्यात गुंतलेली सरकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त होईल. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.


दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल संपल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि पूरग्रस्तांच्या मदतकार्यावर जादा भर देण्यात यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.