मुंबई : कार्यक्षम अधिका-यांना पुन्हा आपला कार्यकाळ करण्यापूर्वीच बदलीला सामोरं जाव लागल्याचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. पनवले महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली झाली आहे. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळल्यानंतर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावाला बळी पडले. स्थानिकांनी शिंदे यांच्या बदलीला विरोध केला होता. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवक आणि स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिंदे यांच्या बदलीची मागणी केली होती. 


आणखी कोणत्या अधिका-यांची झाली बदली


लक्ष्मी नारायण मिश्रा - रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी - वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी बदली


राहुल द्विवेदी - वाशिमचे जिल्हाधिकारी - अहमदनगर जिल्हाधिकारी


आचल गोयल - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या - रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी


शेखर चेन्ने - राज्य निवडणूक आयोगाचे सचिव - परिवहन आयुक्त आणि निवडणूक आयोगाचा अतिरिक्त पदभार


नवलकिशोर राम - औरंगाबादचे जिल्हाधिकारी - पुणे जिल्हाधिकारी


सुनील चव्हाण - ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त - औरंगाबाद जिल्हाधिकारी


डॉ. सौरव राव - पुण्याचे जिल्हाधिकारी - पुणे महापालिका आयुक्त


डॉ. एस. एल. माळी - महिला आणि बालकल्याण आयुक्त - नांदेड महापालिका आयुक्त


माधवी खोडे-चावरे - अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर - महिला आणि बालकल्याण आयुक्त


एस. राममूर्ती - अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी - महाव्यवस्थापक, खाण महामंडळ नागपूर


डॉ. संजय यादव - एमएमआरडीएचे - अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी


बुलडाण्याचे जिल्हाधिकारी सीएल पुलकुंडवार – सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी


निरुपमा डांगे - खाण महामंडळ नागपूरच्या महाव्यवस्थापक - बुलडाणा जिल्हाधिकारी


सुधाकर शिंदे - पनवेल महापालिकेचे आयुक्त - मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना


गणेश देशमुख - पनवेल महापालिका आयुक्तपदी नियुक्ती


डॉ. बिपिन शर्मा - पुण्याचे शिक्षण आयुक्त - संचालकीय व्यवस्थापक, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे


रुचेश जयवंशी पाणी पुरवठा विभाग - दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे


एन. के. पाटील - दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे - प्रशिक्षण


डॉ. ए. एम. महाजन - अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष - पाणी पुरवठा विभाग


एस. आर. जोंधळे - जालन्याचे जिल्हाधिकारी - मुंबई शहर जिल्हाधिकारी


एम. जी अर्दाड - औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी - अहमदनगर महानगरपालिका आयुक्त


जी. सी. मांगले - अहमदनगर महानगरपालिका आयुक्त - महानंदचे व्यवस्थापकीय संचालक


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारच्या पवनीत कौर - औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी


एच. मोडक - अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर