मुंबई: कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य सेविकांच्या मोबदल्याची रक्कम ४ हजार रुपयांनी वाढवण्यात येईल. यापूर्वी आरोग्य सेविकांना पाच हजार रुपये इतके मानधन दिले जात होते.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ही वाढ सप्टेंबर २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. सात महिन्यांच्या थकबाकीसह वाढीव मानधन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येईल. याशिवाय, लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक दिवसासाठी आरोग्य सेविकांना ३०० रुपयांचे विशेष जादा मानधनही देण्यात येणार आहे. 


राज्यात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी - राजेश टोपे


सध्याच्या घडीला मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरात आरोग्यसेविका जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या तुलनेत त्यांचे मानधन अत्यंत तुटपुंजे होते. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ७,०६१ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत शहरातील २९० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेविकांची मदत महत्त्वपूर्ण ठरत आहे. 


सध्या कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या महसूलात मोठी घट झाली आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यातही सरकारला अडचण येत आहे. गेल्या महिन्यात सरकारने अनेक कर्मचाऱ्यांचा दोन टप्प्यांत देऊ केला होता. तर दुसरीकडे केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळातील आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील दीड वर्ष कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आगामी काळात राज्य सरकारकडूनही हाच कित्ता गिरवला जाऊ शकतो.