मुंबई : शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाचे निकालात कोणता उमेदवार आघाडीवर आहे, याचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी निकाल स्पष्ट होण्यास संध्याकाळचे ७ वाजणार आहेत. प्राथमिक कलानुसार आघाडीला मतदारांनी सुरुवातीला का असेना आघाडी मिळवून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती - UPDATE 8PM


अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणी.. दुसऱ्या राउंड नंतर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर.


 30918 हजार मतांची मोजणी पूर्ण...


किरण सरनाईक,अपक्ष  3131+2957= 6088


श्रीकांत देशपांडे(महा विकास आघाडी) 
2300+2822 = 5122


शेखर भोयर,अपक्ष 
2078 +2811=  4889


संगीता शिंदे अपक्ष उमेदवार
1304+1553=2857


पुणे | प्राथमिक कल हाती, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी, तर भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर 


पुणे | शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी  अजूनही कायम


अमरावती विभाग शिक्षक निवडणूक |  अपक्ष उमेदवार आघाडीवर - आघाडीचे श्रीकांत देशपांडे दुसऱ्या स्थानी तर भाजप उमेदवार नितीन धांडे पिछाडीवर, अपक्ष किरण सरनाईक 831 मतांनी पुढे


औरंगाबाद पदवीधर निवडणूक | आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर