मुंबई : राज्य सरकारच्या (Maharashtra) आरोग्य विभागाचा धक्कादायक कारभार उजेडात आला आहे. जनजागृतीसाठी आरोग्य विभागाकडून आशा सेविकांना कुटुंब नियोजन किट (Family Planning Kit) देण्यात आली. पण या किटमध्ये चक्क 'रबराचं लिंग' देण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी भाजप (BJP) महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त करत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. चित्रा वाघ यांनी फेसबुक पोस्ट करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. 


ठाकरे सरकारवर गंभीर आरोप
आशा वर्कर्सना देण्यात येणाऱ्या कुटुंब नियोजन किटमध्ये प्रजनन अवयवांच्या रबर मॉडेलचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यातील तमाम महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य त्याद्वारे करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे सरकारला या प्रकरणाचे गांभीर्य जाणवत नाही का असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. 


याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल का, असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांनी म्हटलंय, बुलढाणा-कुटुंबनियोजन किटमध्ये रबरी लिंगाचा समावेश सरकारने करून त्याची जनजागृती करण्याचे काम आशा वर्करना दिलयं 
भारतीय दंड विधान ३५४ प्रमाणे (मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य) डोक्यावर पडलेल्या या ठाकरे सरकार वर विनयभंगाचा गुन्हा तात्काळ दाखल व्हावा. 



आशा वर्कर्सनेही व्यक्त केली नाराजी
कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी मॉडेल समाविष्ट केल्याबद्दल आशा सेविकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, जागरूकता वाढवण्यासाठी हे करण्यात आल्याचं सरकारचे म्हणणे आहे.


कुटुंब नियोजन किटच्या साहाय्याने कुटुंब नियोजनाविषयी लोकांना सांगत असताना विचित्र स्थितीला सामोरं जावं लागतं असं आशा वर्कर्स सांगतात.