मुंबई : राज्यासह मुंबई त दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णही शंभरीपार जात आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का, अशी चर्चा सर्वसामांन्यामध्ये सुरु आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात लॉकडाऊन लावण्याच्या शक्येतवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (maharashtra health minister rajesh tope give reaction over to lockdown probiblity)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजेश टोपे काय म्हणाले? 


"लॉकडाऊन हा शब्दप्रयोग कुठे करायचा नाही. 100 टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. व्हायरसला नियंत्रणात आणायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीत गर्दी थांबवणं हा महत्त्वाचा भाग आहे", असं राजेश टोपे यांनी नमूद केलं. 



राज्यात कोरोनाचे दिवसभरात किती रुग्ण? 


राज्यात दिवसभरात 26 हजार 538 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात 5 हजार 331 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या मृत्यूदर हा 2.09 टक्के इतका आहे.


मुंबईत किती कोरोना रुग्ण? 


मुंबईतही कोरोनाचा जोर पाहायला मिळतोय. मुंबईत कोरोनाचे 24 तासात 15 हजार 166 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 714 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे.


ओमायक्रॉनचे रुग्ण किती?


राज्यात 144 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. ओमायक्रॉनचे सर्वाधक रुग्ण हे मुंबईत सापडले आहेत. मुंबईत 100 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.