मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात (Maharashtra Corona Update) काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या रुग्णवाढीमुळे राज्य सरकारचीही चिंता वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आधीच काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र वाढता आकडा पाहता राज्यात आणखी कठोर निर्बंध (Corona Restriction) लावण्याबाबत संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)  यांनी दिले आहेत. (Maharashtra Health Minister Rajesh Tope Gives hint corona strict restrictions over to third wave)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्यमंत्री काय म्हणाले? 


"रुग्णसंख्या आणखी वाढली तर रुग्ण दुप्पटीचा दर वेगाने वाढेल. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात रुग्णांचा आकडा आणखी वाढेल", अशी भिती आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 



सर्वांनी काळजी घ्यायला हवी. राज्यात आपण निश्चितपणे कमी जास्त प्रमाणात निर्बंध वाढवलेले आहेत. याची सर्व लोक प्रतिनिधींनी गांभिर्याने नोंद घ्यावी. कोव्हिड नियमांच पालन करावं", असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं. 


राज्यात तिसरी लाट? 


राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 2 हजार पेक्षा जास्त रुग्णांचं निदान झालं आहे. तर मुंबईमधील आकड्याने हजारी ओलांडली आहे.  


राज्यात 2 हजार 172 तर मुंबईत 1 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत राज्यात आज 50 टक्के रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईतही संख्या तब्बल 70 टक्क्यांनी वाढली आहे.