Maharashtra Corona | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळात राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या मंत्रिमंडळात राज्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Corona) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर कोरोना टेस्टिंग आणि मास्क सक्तीबाबत विधान केलं आहे. (maharashtra health minister rajesh tope informed state cabinet meeting had ordered to increase corona test backdrop of increasing covid)
राजेश टोपे काय म्हणाले?
"मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला नक्कीच कोरोना पॉझिटिव्ही रेट वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. पॉझिटिव्ही रेट वाढल्यानं कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना अतिशय कडक पद्धतीने देण्यात आल्या आहेत", असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
"रविवार असल्याने काल कोरोना टेस्ट काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र आज सोमवारपासून कोरोना चाचणी वाढवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्हीटी रेट या 6 जिल्हयांमध्ये वाढल्याचं दिसतंय. म्हणजे 8, 6, 5 आणि 3 टक्के असा पॉझिटिव्हीटी रेट आहे. याचाच अर्थ असा की दर 100 कोरोना चाचणींमधून कमाल 8 तर किमान 3 जण कोरोनाबाधित सापडत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं.
मास्कसक्तीबाबत निर्णय काय?
मास्कसक्ती कुठेच नाहीये. मात्र मास्क वापराबाबत आवाहन करण्यात केलं आहे. तसेच आवाहनाची अंमलबजावणी व्हावी. तसेच एखाद्याने मास्क घातला नसेल, तर त्याला मास्क घाल, असं म्हटलं पाहिजे. याबाबतची चर्चाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली आहे", असं टोपेंनी सांगितलं.