Sharad Pawar on Maharashtra Karnataka Border Dispute  : महाराष्ट्र-कनार्टक सीमावाद (Maharashtra Karnataka Border) पुन्हा एकदा पेटलाय. या सीमावादाचे पडसाड राज्यभरत विविध ठिकाणी पहायला मिळतायेत. यावरुन महाविकास आघाडीही (Mahavikas Aghadi) आक्रमक झालीय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar on Border Dispute) घेत या सर्व सीमावादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच या मुद्द्यावरुन राज्यासह केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय. (maharashtra karnataka border dispute ncp chief sharad pawar aggresive on basavaraj bommai central government fadnavis)


पवार काय म्हणाले? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सीमेवर जे घडलंय ते निषेधार्ह आहे. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. तसंच राज्य सरकारही बघ्याची भूमिका घेतंय. देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन काहीच फायदा झाला नाही.  दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईमुळे (Basavaraj  Bommai) परिस्थिती चिघळली", अंस पवार म्हणाले.  


"सीमावादात जे घडतंय त्याबद्दल भूमिका घेण्याची वेळ आली आहे. मी आजचा दिवस खऱ्या अर्थाने ज्यांनी संविधान लिहिलं. त्यांनी संविधानामध्ये समान अधिकार दिले. अशांना स्मरण करण्याचा दिवस. बाबासाहेबांचा स्मरणाच्या दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण गेल्या आठवड्यांपासून वेगळ्या स्वरुपात नेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा कर्नाटकाच्या मुख्यंमंत्र्यांचा आहे", अशा शब्दात पवारांनी बोम्मई यांच्यावर हल्लाबोल केला. 


"उपमुख्यमंत्र्यांच्या संपर्कांचा फायदा नाही"


"देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संपर्क साधला, पण उपयोग झाला नाही" असं सांगत पवारांनी राज्यासह केंद्र सरकारवर टीका केली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सीमावादावरुन बोम्मईंशी संपक्र साधला होता. फडणवीसांनी आतापर्यंत झालेल्या राड्याबद्दल तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. तर बोम्मईंनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं होतं. 


कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा


"24 तासात हल्ले थांबले नाहीत तर आमच्या संयमाला वेगळं वळण लागेल. याची जबाबदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची असेल. 48 तासात परिस्थिती सुधारली नाही तर माझ्यासह सर्वजण कर्नाटकतात जातील", असा अल्टीमेटम पवारांनी दिला.