मुंबई : Anil Parab : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना अखेर शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मुंबई उच्च न्यायालयात खेचले आहे. यावेळी अनिल परब म्हणाले, गेले काही महिने माझ्यावर किरिट सोमय्या हे कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. यात माफी मागण्याचीही मागणी केली आहे. पुरावेही जोडले आहेत. यात मला न्याय मिळेल, असे मंत्री परब म्हणाले. (Maharashtra Minister Anil Parab files Rs 100 crore defamation suit against Kirit Somaiya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी चुकीचे काहीही केलेले नाही. मी न्यायमूर्तीचे काम हातात घेतलेले नाही. जसं किरीट सोमय्या हे हातात घेतात. बेछूट आरोप करून प्रतिमा मलिन केली जात आहे. प्रत्येकाला निवडणूक जिंकायची आहे. लोकांसमोर आम्ही कामे घेवून जाणार आहोत. यावेळीही शिवसेनेवर लोक विश्वास ठेवतील, असे मंत्री अनिल परब म्हणाले.


किरीट सोमय्या यांनी मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांच्या घोटाळ्यांबाबत पत्रकार परिषद घेऊन आरोप करत आहोत. आरोपाची ही मालिका सुरु आहे. अनिल परब यांना सातत्याने लक्ष्य करून अनिल देशमुख प्रकरणात परब यांचाही सहभाग असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.


एसटी कर्मचाऱ्यांना सल्ला देताना ते म्हणाले, कालची जी आत्महत्या झाली ती दुर्देवी आहे. कुणीही आत्महत्या करू नये. पगार मागेपुढे झाले आहेत. प्रत्येक महिन्याचा पगार दिला जातोय. कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या त्याने केल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहलंय. आपले सर्व प्रश्न सुटतील, असे ते म्हणाले.