सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारांचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा
काय ते आमदार. काय ती हाणामारी आणि काय तो राडा. अजिबातच नॉट ओक्के. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात बुधवारी आणखी एका काळ्या दिवसाची नोंद झाली. कारण विधान भवनाच्या पाय-यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.
मुंबई : विधान भवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर आज अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की झाली. अगदी एकमेकांना शिवीगाळ देण्यापर्यंत या आमदारांनी मजल मारली. कायदे मंडळ असलेल्या विधान भवनाच्या पाय-यांवरच कसा राडा झाला, पाहूयात हा रिपोर्ट. (maharashtra monsoon session 2022 mla of ruling and opposition parties cried on steps of the vidhan bhavan)
काय ते आमदार. काय ती हाणामारी आणि काय तो राडा. अजिबातच नॉट ओक्के. महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात बुधवारी आणखी एका काळ्या दिवसाची नोंद झाली. कारण विधान भवनाच्या पाय-यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.
आधी दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये आधी घोषणाबाजी रंगली. ५० खोके, एकदम ओके. अशा घोषणा विरोधक देत होते. तर स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके. लवासाचे खोके, बारामती ओके. अशा घोषणा सत्ताधारी आमदारांनी दिल्या.
पण काही क्षणांतच दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की सुरू झाली. आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात पहिली ठसन झाली. थोड्याच वेळात अक्षरशः फ्री स्टाईल सुरू झाली.
या सगळ्या धक्काबुक्कीबाबत अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांकडे, तर महेश शिंदेंनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली...
खरं तर तुमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही आमदारांना विधिमंडळात पाठवता, पण तेच आमदार तिथं जाऊन काय करतात, ते पाहिलंत ना...?
विकासाचा अडला गाडा आमदारांचा राडा
महाराष्ट्रातला शेतकरी ओल्या दुष्काळानं त्रस्त आहे. अतिवृष्टीनं पिकांचं अतोनात नुकसान झालंय. नुकसानभरपाई दूर, साधे पंचनामेही झालेले नाहीत. महाराष्ट्रातल्या रस्त्यांची चाळण झालीय.
खड्ड्यातून वाट काढताना हजारो लोकांचे बळी गेलेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर राजकीय नेत्यांचाच मृत्यू होतोय, तिथं सामान्य जनतेला कोण विचारणार? ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय.
हे आणि यासारखे जनतेचे असंख्य प्रश्न अजून सुटलेले नसताना. आपले आमदार मात्र एकमेकांच्या कुचाळक्या करण्यात व्यस्त आहेत..
आमदारांबद्दल जनतेच्या मनात किती संतापाच्या भावना आहेत, ते तुम्ही पाहिलंत...
विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ. तिथं आमदारच कायदा हातात घेतायत, राडा घालतायत. मग दाद मागायची तरी कुणाकडे? आता तुम्हीच मतदार म्हणून मतपेटीतून यांना धडा शिकवा. यांना त्यांची योग्य जागा दाखवा.