Maharashtra Police Recruitment 2022 | राज्यात लवकरच पोलीस भरती
पोलीस दलात सामील होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीबाबत (Maharashtra Police Recruitment 2022) मोठी बातमी समोर आली आहे.
सागर कुलकर्णी, झी मीडिया मुंबई : पोलीस दलात सामील होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पोलीस भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) होणार आहे. पोलीस कॉनस्टेबल पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे कॉनस्टेबल पदासाठी एकाच वेळी ही सर्व प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. (maharashtra police recruitment 2022 police recruitment for 7 thousand constable posts in state soon)
एकूण 7 हजार पदांसाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे पहिल्य टप्प्यात 7 हजार पदांच्या भरतीनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.
यापूर्वीच मागील काही वर्षांमध्ये पोलीस भरती करण्याचे नियोजन झाले होते. पण मध्यंतरी कोव्हिडमुळे दीड ते दोन वर्ष पूर्ण क्षमतेने पोलीस भरती झाली नव्हती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलीस भरती करण्याबाबत सुचक वक्तव्य केलं होतं.
आता पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात साधारणता साडेपाच हजार पेक्षा जास्त पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती केली जाणार आहे. सर्व आरक्षणासह या पदांची भरती होणार आहे.