मुंबई : राज्य सरकारने (Maharshtra Government) पोलीस शिपाई भरती (Maharashtra Police Recruitment) करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील तरुणांमध्ये आनंदाची लाट पसरली. मात्र अवघ्या तासांमध्येच सरकारने भरतीला स्थगिती दिली. त्यामुळे तरुणांच्या आनंदावर विरझन पडलं. दरम्यान यानंतर पोलीस भरतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस भरतीच्या अटी शर्थींमध्ये बदल सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. (maharashtra police recruitment state government may change terms and conditions)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस शिपाई भरती नोव्हेंबरमध्ये होणार होती. त्यानुसार 1 नोव्हेंबरला जिल्हानिहाय जाहीरात प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र सरकारने प्रशासकीय कारण देत भरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगित दिली. पण यामागे सर्व वयोगटातील तसंच समाजघटकांमधील तरुणांना पोलीस भरतीत संधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जातंय. 


मराठा आरक्षण रद्द झाल्यानं त्याचाही फटका भरतीला बसू नये, याची काळजी सरकारदरबारी घेतली जात असल्याचं म्हटलं जातंय. तसेच भरतीबाबत जातनिहाय फेरआढावा घेण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. सोबतच गरज पडल्यास अटी-शर्तींमध्येही बदल करण्याचा विचार सुरु असल्याचं समजतंय. गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येईल अशी माहितीही सूत्रांनी दिलीय. जवळपास 14 हजार 956 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती. त्यामुळे आता या भरतीला पुन्हा केव्हा मुहुर्त मिळणार, याकडे राज्यातील इच्छूकांचं लक्ष असणार आहे.