Sharad Pawar vs Ajit Pawar : अजित पवार यांनी बंड करुन शिंदे-फडणवीस सरकारबरोबर (Shinde-Fadanvis Government) हातमिळवणी केली. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी एक धक्का दिल आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते (National Leader) करुन थेट पवारांना आव्हान देण्यात आलंय. अजित पवारांना राष्ट्रीय नेते करण्याचा प्रस्ताव अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडला, त्याला मेळाव्याला उपस्थितांनी अनुमोदन दिलं.  निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पत्रात अजित पवार एनसीपी राष्ट्रीय अध्यक्ष असल्साचे म्हटल आहे. पवार यांच्या निवडीचा ठराव मंजूर केल्याचे पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार गटानं निवडणूक आयोगाला 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलंय. या पत्रात 30 जूनला अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड झाल्यांचं म्हंटलंय. विशेष म्हणजे शपथविधीच्या 2 दिवस आधीच अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आल्याचं समोर आलंय. रविवारी म्हणजे 2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शपथ घेण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे 30 जूनला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. तसंच विरोधी पक्षनेतेपदाचीही राजीनामा दिला होता. 


यानिमित्तानं अजित पवारांनी विधानसभेसाठी 90 जागा लढवण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या 90 जागा लढवेल. तसच लोकसभा निवडणूकही लढवेल असं अजित पवारांनी म्हंटलंय. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाईल आणि निर्विवाद यश मिळवेल असा आशावाद अजित पवारांनी व्यक्त केलाय. 


मुक्काम ताज हॉटेल
राष्ट्रवादीच्या अजित पवार समर्थक आमदारांचा मुक्काम आता हॉटेलात असणाराय. मुंबई वांद्रे बँडस्टॅंड इथल्या ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये आमदारांना एकत्र ठेवण्यात आलंय. MET मधील मेळावा आटोपल्यानंतर बसमधून आमदारांना थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेण्यात आलं. सध्या अजित पवारांकडे असलेले आमदार फुटू नयेत, यासाठी ही खास काळजी घेतली जातेय.


मला मुख्यमंत्री व्हायचंय
मुख्यमंत्री व्हावं ही आपली इच्छा आहे असं अजित पवारांनी थेट बोलून दाखवलंय. लोकांनी मला 5-5 वेळा उपमुख्यमंत्री केलं. माझ्या नावावर उपमुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड आहे. मात्र गाडी तिथेच थांबते अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवलीय. . दरम्यान, अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला.. साहेब वयाची ऐंशी वर्ष झाली, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा सवाल अजित पवारांनी विचारला..