Maharashtra Political Crisis : ठाकरे-पवार यांच्यातील बैठक संपली, काय असेल पुढची रणनिती?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि एनसीपी प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील बैठक अखेर संपली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि एनसीपी प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्यातील बैठक अखेर संपली आहे. ठाकरे-पवार यांच्यात तब्बल 2 तास चर्चा झाली. या बैठकीला संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान सुरुवात झाली होती. तब्बल 2 तास ही बैठक चालली. बैठकीनंतर पवार मातोश्रीबाहेर पडले आहेत. बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या गोटातील बंडखोरांना रोखण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (maharashtra political crisis cm uddhav thackeray and ncp chief sharad pawar meeting completed after 2 hours at matoshree)
या बैठकीला शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर शरद पवार बाहेर पडले. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र शिवसेनेच्या बंड पुकारलेल्या आमदारांना रोखण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
दरम्यान शुक्रवारी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्या दुपारी 1 वाजता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री या बैठकीत व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.