Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना आताची मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. संध्याकाळी भाजपच्या नेत्यांची सागर बंगल्यावर बैठक झाली त्यानंतर सर्व नेते राजभवनावर पोहोचले आहेत. यात देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचे राजकीय परिस्थिती आज नवे वळण घेऊ शकते. सरकार स्थापनेसाठी बंडखोर आमदार भाजपसोबत चर्चा करत आहेत. यासंदर्भात आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत होते. इथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. 


त्यानंतर फडणवीस संध्याकाळी तातडीने मुंबईतला परतले. त्यानंतर संध्याकाळी भाजपच्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर सागर बंगल्यावर बैठक घेतली आणि आता ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. 


राज्यातील राजकीय अस्थिरतेबाबत भाजप आज राज्यपालांना पत्र देऊन सरकार अल्पमतात असल्याने बहुमत चाचणीची मागणी करण्याची शक्यता आहे. यावर राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


आतापर्यंत भाजपने वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीवरुन परतल्यानंतर भाजप थेट मैदानात उतरलं आहे.