कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात सत्तास्थापन होऊन (Maharashtra Political Crisis) महिना उलटलाय. मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला अजूनही मुहूर्त सापडत नाहीये. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकनाथ शिंदे गटाची (Eknath Shinde Group) खलबतं सुरु आहेत. शिंदे गटाची आज (5 ऑगस्ट) बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे. (maharashtra political crisis eknath shinde group mla today 5 august meeting cancel)


नक्की कारण काय?


शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांबाबत या बैठकीत चर्चा होणार होती. या बैठकीचं ठिकाण ठरलेलं नव्हतं. मात्र ही बैठक अतिशय महत्त्वाची समजली जात होती. मात्र अनेक आमदार हे आपआपल्या मतदारसंघात असल्या कारणाने ही बैठक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान याआधी शिवसेनेचीही मातोश्रीवरही बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठकही अशाच प्रकारे रद्द करण्यात आली.