बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, चर्चांना उधाण
स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Smita Thackeray-Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : राज्यातील सत्तानाट्यानंतर (Maharashtra Political Crisis) अखेर नव सरकार स्थापन झालंय. मात्र अजूनही सत्तासंघर्ष सुरुच आहे. एकनाथ शिंदे गटाने आता शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या चिन्हावरच दावा ठोकलाय. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी ताणला गेलाय. या सर्व दरम्यान स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (maharashtra political crisis jaydev thackeray wife smita thackeray meet cm eknath shinde at sahyadri government house)
स्मिता ठाकरे काय म्हणाल्या?
स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट झाली. आपण सक्रिय राजकारणात नाही स्वयंसेवी संस्थेचं काम करत आहोत. त्यासंदर्भात ही सदिच्छा भेट घेतल्याचं स्मिता ठाकरे म्हणाल्या. शिवसेना फुटीबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही आणि बोलायचं नाही असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरेंची सून आणि जयदेव ठाकरेंच्या पत्नी आहेत.
स्मिता ठाकरे यांच्याबाबत थोडक्यात (Who Is Smita Thackeray)
स्मिता ठाकरे या सिनेनिर्मात्या आहेत. स्मिता यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. ठाकरे घराण्याची सून स्मिता यांनी यापूर्वी रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलंय. स्मिता यांचा विवाह बाळ ठाकरे यांचा दुसरा मुलगा जयदेव यांच्याशी झाला होता. स्मिता ही जयदेव यांची दुसरी पत्नी आहे. जयदेव आणि स्मिता यांचा आता घटस्फोट झाला आहे.