मुंबई :  राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा (maharashtra political crisis) भूकंप घडला आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा (Cm Uddhav Thackeray Resign) राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला. (maharashtra political crisis uddhav thakceray step down of chief minister post)


बहुमत चाचणीआधीच राजीनामा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायलयाने गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता बहुमत चाचणी होणार होती. मात्र या बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासह आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आलं होतं. सत्तेत असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात नेमकी शिवसेना कुणाची यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर या सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे. 


पुढची भूमिका काय? 


मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपली पुढील रणनिती स्पष्ट केली आहे. आता पुढे मी  शिवसेना भवनावर जनतेच्या सेवेसाठी उपस्थित असणार आहेत. शिवसेनेची जबाबदारी सांभाळणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.