Hindutva : कोण चालवतंय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा?
महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) यापुढं हिंदुत्वाभोवती (Hindutva) फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय.
मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) यापुढं हिंदुत्वाभोवती (Hindutva) फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय. आम्हीच हिंदूंचे कैवारी असल्याचा दावा सगळेच नेते करतायत. पाहूयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. (maharashtra political hindutva ideology raj thackeray eknath shinde uddhav thackeray balasaheb thackeray)
पाहिलंत? राज ठाकरे काय म्हणतायत? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आपणच चालवत असल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा केलाय.. हा वारसा आहे जहाल आणि कट्टर हिंदुत्वाचा. ऑपरेशनमुळं काही काळ शांत असलेले राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आलेत. राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है भगवाधारी. हेच त्यांनी पुन्हा ठासून सांगितलंय.
तर बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंचा हिंदुत्वाचा वारसा आम्हीच पुढं नेत असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जातंय...
भाजपनं तर कट्टर हिंदुत्वाची भूमिका वेळोवेळी जाहीर केलीय. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हिंदू सण आणि उत्सव धूमधडाक्यात साजरे होतील, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.
आमचं हिंदुत्व तुमच्या हिंदुत्वापेक्षा अधिक भगवं आहे, हे सांगण्याची स्पर्धाच सध्या राजकीय पक्षांमध्ये सुरू झालीय... शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप पाठोपाठ आता मनसेनंही या हिंदुत्वाच्या आखाड्यात हनुमान उडी घेतलीय.