भगतसिंह कोश्यारींची राज्यपालपदावरून मुक्त होण्याची इच्छा, सूत्रांची माहिती
छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्य भोवणार? Bhagat Singh Koshyari राज्यपाल पदावरुन मुक्त होणार असल्याची चर्चा, विरोधी पक्षनेत्यांनीही केली टीका
Maharashtra Politics : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दिल्लीतल्या भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी ही इच्छा बोलून दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आता वेगळी जबाबदारी मिळाली असा प्रयत्न कोश्यारी करत असल्याचं समजतंयय. त्यामुळे कोश्यारी राज्यपाल पदावरून मुक्त होणार असल्याच्य़ा चर्चां रंगू लागल्या आहेत. तर अशा चर्चा तथ्यहीन असल्य़ाचा दावा राज्यपालांच्या राजभवनातल्या निकटवर्तीयांनी केलाय. कोश्यारींच्या पदमुक्ततेबाबतच्या चर्चा चुकीच्या असल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितंलय.
संजय राऊत यांचा टोला
राज्यपालांच्या या बातमीसंदर्भात खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ट्विट केलंय. महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने (Shivsena) महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंलय. तसंच राज्यपालांकडून शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही भाजपचे टगे शहाणपण शिकवतात अशी टीका संजय राऊत यांनी केली.
अजित पवार यांनी केला दावा
भगतसिंह कोश्यारींना त्यांच्या राज्यात परतायचं असल्याची इच्छा त्यांनी आपल्याजवळ बोलून दाखवल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. मात्र त्यामागे काय कारण आहे हे त्यांनी सांगितलं नसल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.