`मी आमदार होणार होतो, शरद पवारांनी दगा दिला...` प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट
भाजप नेते आणि राज्यातील शिंदे-फ़डणवीस-पवार सरकारमधील प्रमुख समन्वयक प्रसाद लाड यांनी शरद पवार यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2015 मध्ये आमदार होणार होतो, पण शरद पवार यांनी कसा दगा दिला याबाबत प्रसाद लाड यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे.
Prasad Lad Black & White : राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार (Shinde-Fadanvis-Pawar Government) स्थापन झालं. खातेवाटपावरुन शिवसेना शिंदे गट (SS Shinde Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) धुसफूस असल्याचं बोललं जात होतं. पण अखेर यावर पडदा पडला आणि खातेवाटप जाहीर झालं. भविष्यात या तीन पक्षांच्या सरकारमधील धुसफूस कमी कशी होणार यासाठी सरकारमधल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचा प्रमुख समन्वयक म्हणून भाजप नेते प्रसाद लाड यांची नियुक्त करण्यात आली आहे.
झी 24 तासच्या ब्लँक अँड व्हाईट या कार्यक्रमात मुख्य संपादक निलेश खरे यांच्या प्रश्नांना भाजप नेते प्रसाद लाड (Prasd Lad) यांनी मनमोकळी उत्तरं दिली तसंच अनेक धक्कादायक गौप्यस्फोटही केलेत. सरकराचं समन्वय बननं ही मोठी गोष्ट आहे. आपल्यावरचा पक्षाने मोठा विश्वास टाकला आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट
2014 मध्ये विनोद तावडे आणि आशिष शेलार यांनी आपल्याला नायगाव विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यास सांगितलं. 2014 मध्ये भाजपत प्रवेश करावा असं वाटत होतं, पण त्यावेळी शरद पवार यांनी माझ्याबरोबर फार भावनिक चर्चा केली. तुला खूप काही दिलंय, तुझ्यावर इतकं प्रेम केलं असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांचा आपल्यावर खरंच प्रेम होतं, पण राजकारणात केवळ प्रेम असून चालत नाही. राजकारणात पुढे जाण्याचा मार्ग शोधावा लागतो असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.
प्रसाद लाड भाजपात जाऊ नये यासाठी शरद पवारांनी छगन भुजबळ यांना जबाबदारी दिली होती. त्यावेळी मी त्यांचं ऐकलं. पण त्यानंतर मी का पक्ष सोडलं त्यामागे एक कारण आहे. 2015 साली महानगरपालिकेच्या माध्यमातून विधानपरिषदेचे आमदार निवडून येतात. राष्ट्रवादीची ताकद कमी असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी कमी पडणारी मतं आपण आणू असं सांगितलं. अजित पवार आणि इतर नेतेही त्याला तयार झाले.
विधान परिषदेसाठी मी लढणार असं ठरलं, मनोज कोटक यांनी माघार घेतली. मला अपक्ष लढवून, निवडणून आणून नंतर भाजपचा सहयोगी सदस्य व्हायचं आणि भाजपात जायचं असं सर्व ठरलं. पण मतदानाच्या काही दिवस शरद पवारांनी फोन केला आणि सांगितलं, पत्रकार परिषेद घेऊन तू या निवडणुकीतून माघार घे. पण हे शक्य नसल्याचं शरद पवार यांना सांगितल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं.
यावर शरद पवार यांनी सांगितलं माझ्यावर दबाव आहे, सोनिया गांधींचा निरोप आहे, अहमद पटेल यांचे फोन येतायत. त्यामुळे तू माघार घे. पण निवडणुकीतून माघार घेतली नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा निवडणूक येणाऱा उमेदवार मनोज कोटक यांना बसवून मला तिकिट दिलं होतं. त्यामुळे मी निवडणूक लढलो.
पण त्याच रात्री शरद पवार यांनी नबाव मलिक यांना हाताशी धरत सर्व नगरसेवकांना फोन केले, आणि राष्ट्रवादीची मतं फोडली. यावरच ते थांबले नाहीत. शरद पवार यांनी राज ठाकरे यांनाही फोन केला. राज ठाकरे यांनाही तु्म्ही प्रसाद लाड यांना मदत करुन असं सांगण्यात आलं, असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे. माझे सरकारमधील जे कॉन्ट्रॅक्ट होते, त्यावर चौकश्या लावण्यात आल्या, पैसे अडवले, मुंबई बँकच्या माधम्यातून मी कसा अडकेन हे पाहिलं गेलं असंही प्रसाद लाड यांनी सांगितलं.
असं शरद पवार यांनी करायला नको होतं, इतकंच काय तर मविआचं सरकार आल्यानंतर माझी सुरक्षा काढण्यात आली, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असा गौप्यस्फटोही प्रसाद लाड यांनी केला. माझ्यामागे कोणतंही मोठं घराणं नाही, मी एका कामगाराचा मुलगा, असं असतानाही भाजपने मला इतकं मोठं केलं, माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यामुळे मी भाजपाशी एकनिष्ठ असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं.