Maharashtra Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्यची इच्छा आहे पण गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडते, त्याला मी करुन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आपला पक्ष महायुतीचा (Mahayuti) भाग आहे आणि आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेबरोबरच लढणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव कार्यक्रमात सहभगी झालेल्या अजित पवार यांनी अनेक मुद्दयावर मतं मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीकरांशी चर्चा झाली होती, पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलणी झाली, बाकी कोणाबरोबरही चर्चा झाली नाही, लोकं काय बोलतात याच्याशी काहीही घेणं देणं नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेच्या जागावाटपाबाबत अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. भाजप, शिवसेना आणि आपण किती जागा लढणार याबाबत लवकरच कळेल, पण महायुती तुटणार नाही. महायुतीचं सरकार आणण्याचे आमचे शंभर टक्के प्रयत्न असतील आणि ती जबाबादारी आम्ही पार पाडू असंही अजित पवार यांनी सांगितलं.


शरद पवारांना का सोडलं?


शरद पवारांच्या विरोधात का गेले या प्रश्नावर बोलताना याविषयावर विचार करणं सोडल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. आता पुढचा विचार करतोय, मागे काय घडलं याबाबत विचार करत नाही, आम्ही भविष्य सांगणारी लोकं नाही तर काम करणारी लोकं आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतोय त्यासाठी केंद्राकडून निधी आणण्याचं काम सुरु असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.


मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे पण..


नीतीश कुमार यांच्यासारखाचा उपमुख्यमंत्रीपदावर जास्त काळ राहाण्याचा तुमचा विक्रम आहे या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे पण आमची गाडी उपमुख्यमंत्रीपदावरच अडकतेय, त्याला मी काय करु अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केलीय. मी प्रयत्न करतोय गाडी पुढे जाईल पण संधीच मिळत नाही. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळाली होती. पण पार्टी नेतृत्वाने ही संधी घालवली. 145 जादुई आकडो जो पक्ष गाठेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. माझी महत्त्वाकांक्षा काय आहे, हे मी आता सांगणार नाही. आता आमचं लक्ष्य महायुतीला सत्तेत आणण्याच आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.


महायुती सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. केंद्रात एनडीएचं सरकार आलं आहे, आता महाराष्ट्रातही महायुतीचं सरकार आल्यास त्याचा फायदाच होईल. या अर्थसंकल्पात ज्याप्रमाणे बिहार आणि आंध्रप्रदेशला जास्त निधी मिळाला, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला अधिकचा निधी दिला गेला पाहिजे. यासाठी राज्यात आमचं सरकार आलं पाहिजे, आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्राशी सल्लामसलत करुन तोडगा काढला जाईल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.