Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या म्हणजे मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. 29 नोव्हेंरला ही सुनावणी होणार होती. मात्र, न्यायाधीश आजारी असल्यानं ही सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळं ठाकरे गटानं 8 डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन केलं होतं. वैधानिकदृष्या हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं असताना आणि सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले असताना यावर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटानं (Thackeray Group) केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील सुनावणी 13 डिसेंबरला होईल असं सांगितलं. त्यामुळे आता उद्या मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सत्तासंघर्षाची शेवटची सुनावणी 1 नोव्हेंबरला झाली होती. यात ही सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली, त्यानंतर 29 नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार होती, पण पाच न्यायमूर्तींपैकी एक असलेले न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नसल्याने सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे निर्देश दिले होते.


सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार
एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून (ShivSena) बंडखोरी केली. यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्रेतीची नोटीस बजावली. याविरोधात या 16 आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण, विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षप्रतोद, यासंदर्भातील मुद्दे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिल्यास राज्य सरकारच्या भवितव्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.


धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी आता नव्या वर्षात
दरम्यान, धनुष्यबाण चिन्हाची (Symbol) सुनावणी आता नव्या वर्षातच होणार आहे. धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) आज सुनावणी झाली. आजचं कामकाज अवघ्या पाच ते सात मिनिटांत संपलं. ठाकरे गट आणि शिंदे गट यांना या दोन्ही गटांच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला नाही. आता या प्रकरणाची सुनावणी पुढच्या वर्षी 10 जानेवारीला होणार आहे. दरम्यान, या तारीख पे तारीख वरून ठाकरे आणि शिंदे गटात वार-प्रहार सुरू झालेत.


हे ही वाचा : समुद्धी महामार्गावर पहिला अपघात, कारची जोरदार धडक


चिन्हावरुन आरोप-प्रत्यारोप
जिथे ठाकरे तिथेच शिवसेना असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलंय. धनुष्यबाण हे चिन्हं उद्धव ठाकरेंच्याच (Uddhav Thackeray) नेतृत्वातल्या शिवसेनेचं असं राऊत म्हणाले. शिंदे गटाचा फैसला राज्याची जनताच करेल असं राऊत म्हणाले. तर शिंदे गटालाच धनुष्यबाण चिन्ह मिळणार असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) म्हटलंय.