Maharashtra Politics : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानापासून पेटलेला वाद संपता संपत नाहीये. कारण कोश्यांरीच्या पुढे जाऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महापुरूषांबाबत वादग्रस्त विधानांची स्पर्धाच सुरु केली आहे. आता एकमेकांची लक्तरं वेशीला टांगण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्त्यावरची लढाई सुरू केलीय. महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) मुंबईत हल्लाबोल मोर्चाचं (Hallabol Morcha) रणशिंग फुंकलंय. तर दुसरीकडे या महामोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपनेही (BJP) माफी मांगो आंदोलनाची (Mafi Mango Andolan) हाक दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा असेल मविआचा मोर्चा 
भायखळा एटीएस कार्यालयासमोर शनिवारी सकाळी 11 वाजता मविआचे कार्यकर्ते जमतील. शिवसेना ठाकरे गट (Thackeray Group), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि मित्रपक्षांचे सुमारे 1 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते महामोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी 12 पर्यंत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले असे प्रमुख नेते महामोर्चात सहभागी होतील. जेजे उड्डाणपुलावरून चालत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ मोर्चाचा येणार आणि त्याच ठिकाणी नेत्यांच्या भाषणांनी समारोप होणार. तर मुंबईतल्या सहा लोकसभा मतदार संघात भाजपकडून माफी मागो आंदोलन करण्यात येणारंय. या आंदोलनात भाजपचे मुंबईतील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. 


भाजपचं माफी मांगो आंदोलन 
एकीकडे महाविकास आघाडीने उद्या महामोर्चाचं रणशिंग फुंकलं असताना भाजपने माफी मांगो आंदोलनातून त्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाविकास आघाडी सातत्याने महापुरूषांचा अपमान करत आहे असा आरोप करत भाजप उद्या मुंबईभर माफी मांगो आंदोलन करणार आहे. उद्या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात भाजप आक्रमकरित्या माफी मांगो निदर्शनं करणार आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.


हे ही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीत काळी जादू आणि नागा साधू, लोकशाहीच्या उत्सवात अंधश्रद्धेचा बाजार


 


ल्या काही दिवसांपासून राज्यात महापुरूषांच्या अवमानाचा वाद चांगलाच पेटलाय. वाचाळवीर नेत्यांमुळे या वादाचा भडका दिवसेंदिवस वाढतोय. आता त्याचा पुढचा अंक थेट रस्त्यावर पाहायला मिळणारंय. या मोर्चा आणि आंदोलनातून हा वाद मिटणार की आणखी पेटणार याकडे जनतेचं लक्ष लागलंय.