Eknath Shinde Update : विधानपरिषद निकालानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde) यांना 'मातोश्री'चे निष्ठावंत संबोधले जात होतं, मात्र आता त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना झटका दिला असून 35 आमदारांसह ते नॉट रिचेबल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सध्या सूरतमध्ये असल्याची माहिती असून भाजपशी वाटाघाटी सुर असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचा मुक्कात सूरतमधल्या मेरिडेयन हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. तर आणखी काही आमदार मुंबईतून सुरतला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर शिवसेनेच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या असून सध्या या आमदारांना मुंबईतच रोखून धरले जात आहे. 


शिवसेनेतलं आतापर्यंतच सर्वात मोठं बंड
शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 


आपण एक नजर टाकूया शिवसेनेतल्या आतापर्यंतच्या बंडांवर


शिवसेनेतली मोठी बंड


पहिलं बंड छगन भुजबळांचं 


1991 साली भुजबळांनी शिवसेना सोडली
मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानं भुजबळ नाराज होते
1991 च्या नागपूर अधिवेशनात भुजबळांनी 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला


दुसरं बंड नारायण राणेंचं 
2005मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली
उद्धव ठाकरेंशी असलेल्या मतभेदांमुळे शिवसेना सोडली
11 समर्थक आमदारांसह शिवसेनेला रामराम, काँग्रेसमध्ये प्रवेश


तिसरं बंड राज ठाकरेंचं 
नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली 
विठ्ठलाशी नाही, त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी लढाई आहे, असं सांगत राज ठाकरेंनी शिवसेना सोडली
आमदार बाळा नांदगावकरांसह समर्थकांसह शिवसेना सोडली 


आता एकनाथ शिंदेंसमोरचे पर्याय


- 2/3 आमदारांसह बाहेर पडल्यास सर्वांची आमदारकी शाबूत राहणार


- भाजपबरोबर सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा होणार


- 2/3 पेक्षा कमी आमदारांसह बाहेर पडल्यास सर्व आमदार अपात्र ठरतील


- शिंदेंसोबतचे आमदार अपात्र ठरल्यानं बहुमताचा आकडा खाली येईल


- बहुमताचा आकडा खाली आल्यास भाजपला अपक्षांच्या मदतीनं सरकार स्थापन करता येईल


- शिंदे आणि समर्थक आमदार निवडणूक लढवून भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार 


एकनाथ शिंदे नाराज का ? 


ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे नाराज
आदित्य ठाकरेंकडे अधिक अधिकार असल्यानं नाराज 
निर्णय प्रक्रियेत स्थान न दिल्यानं नाराज
मंत्रिपदाचा तिजोरीसारखा वापर केल्यानं नाराज 
आमदारांना वेळ देत नसल्यानं नाराज 


राज्यातील राजकीय घडामोडींबाबत दिल्लीतही मोठ्या हालचाली घडत आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहचले असल्याची माहिती मिळतेय. लवकरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे.