Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी (Oath Ceremony) केला, पवारांशी खातेवाटप-महामंडळांविषयी चर्चाही झाली होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केला आणि तिथूनच पहाटेच्या शपथविधीमागे कुणाची खेळी अशी चर्चा सुरु झाली. फडणवीसांनी केलेला हा दावा पवारांनी यापूर्वी खोडून काढला होता, मात्र आता पवारांनीच गुगली टाकलीय. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट (President Rule) उठली असं विधान पवारांनी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस यांची प्रतिक्रिया
पवारांच्या या विधानावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार यांनी खुलासा केला आहे, आता माझी त्यांच्याकडून अजून अपेक्षा आहे, राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या सांगण्यावरुन लागली? त्याच्या पाठिमागे काय होतं? याही संदर्भातला खुलासा त्यांनी केला तर सर्व कड्या जुळतील, त्यामुळे यासंदर्भातलं उत्तर पवारांकडूनच यावं ही आपली अपेक्षा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 


पहाटेचा शपथविधी
23 नोव्हेंबर 2019 ला भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीमुळे राज्याचं राजकारणच बदललं आणि पुढे काय काय घडलं.. ते अवघा महाराष्ट्र जाणतोच..दरम्यान आतापर्यंत आपण जे बोललोय ते अर्धच बोललोय अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती..



जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली असं विधान केलं होतं. त्यानंतर फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी पवारांच्याच पाठिंब्यानं झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यात आता पवारांनी पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली असं विधान केलंय. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय घडलं, कोण खरं कोण खोटं याचा पिक्चर अभी बाकी हैं.. असं म्हणायला वाव आहे..