Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो यात्रेत' (Bharat Jodo Yatra) ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे (Adity Thackeray) यांनी हजेरी लावली होती. या यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत काही अंतर चालले. महाराष्ट्रातल्या हिंगोलीत (Hingoli) भारत जोडो यात्रा आली असताना आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यात्रेत सहभागी झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे बिहारचा (Bihar) दौरा करणार असून तिथे काही नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. बिहारमध्ये आदित्य ठाकरे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेणार आहेत. बुधवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला आदित्य ठाकरे एक दिवसांचा बिहार दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी हे देखील दौऱ्यावर असणार आहेत. 


आदित्य ठाकरे सक्रिय
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरे चांगलेच सक्रिय झाले असून नव्याने संघटना बांधणीसाठी ते जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरे बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असून आता थेट राज्याबाहेर दौऱ्यावर जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हे दोन तरुण नेते देशात उर्जा निर्माण करतील असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं.


राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार?
राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याचे संकेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी दिलेयत...मविआ सरकार जाईल असं कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले...यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही...सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलीय...त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला दानवेंनी कार्यकर्त्यांना दिलाय...तर शिंदे फडणवीस सरकार 100 टक्के पडणारच असं राऊतांनी म्हटलंय...त्यामुळे राज्यात मध्यावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय...तर मजबूत स्थितीत असून 20-25 आमदारांचं छुपं समर्थन असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.