Maharashtra Politics: `ठोकून काढा` म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले `मी आदेश देतो...
Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे.
Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना आता विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2025) तयारीला लागलीय. त्याचाच एक भाग म्हणून आज ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. मुंबईतल्या रंगशारदा इथं पार पडलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. लढाईला तोंड फुटलंय, हर हर महादेव ही महत्वाची घोषणा आहे. लोकसभेत आणखी विजयाची अपेक्षा होती. अमोलही जिंकलाच आहे. अखिलेश,ममता बॅनर्जी भेटल्या. अनेकजण बोलले की तुम्ही देशाला दिशा दाखवली. वाकडे गेलात की तोडू, भाजप म्हणजे चोर माणसं, राजकारणातील षंढ माणसे असा नडलो की मोदींना घाम फोडला असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी यांच्यावर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
यावेळी बोलाताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आव्हान दिलं. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळव्यात देवेंद्र फडणवीस यांनी 'ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करा, मैदानात उतरा ठोकून काढा, पण अट एकच आहे, हीट विकेट होऊ नका, तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेश देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. याला उद्धव ठाकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे, कोणी हात उगारला तर हात जागेवर ठेवायचा नाही, बिनधास्त अंगावर जा, आदेश पाहिजे तर आदेश देतो, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
अनेकांना फोन येत असतील, पण जायचं तर उघडपणे जा, आत राहून दगाबाजी करु नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. पैसे मिळतायत, म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करु नका? मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचे फडणवीसाचे डाव होते, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला होता, पण एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहिन असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आयुष्यातील हे सर्वात मोठे आव्हान. यानंतर आव्हान देणारा कुणी उरला नाही. शिवसेनेची तळपती तलवार आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत. शेलारमामा...आताचा नाही.त्याचे नावही घ्यायचा तो लायकीचा नाही, असा हल्लाबोल आशिष शेलार यांचं नाव न घेता केला.
मुंबई ओरबाडताना मी गप्प बसू शकत नाही. आलात तर तोडून टाकू, हे व्यापारी आपल्यात फूट पाडतायत. एवढे खाताय ते जातंय कुठे..खायला काही मर्यादा आहे की नाही. धनाढ्य आणि चोऱ्या माऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करतायत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का ? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्यांच्या हातात जाईल. मराठीला प्रवेश नाही म्हणतात, हिले कानफाट फोडा, गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीय.