Sharad Pawar : राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झाल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार सध्या कुठलाही दौरा करणार नाहीयत. सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे धुळे, जळगावचा दौरा करणार नसल्याचं सांगण्यात आलंय. पावसाचा अंदाज घेऊन इथल्या सभा लवकरच जाहीर होणारेत. मात्र उद्याची येवल्याची सभा घेणारेत. छगन भुजबळांचा (Chagan Bhujbal) मतदारसंघ येवल्यात ही सभा होणारेय. त्यासाठी शरद पवार उद्या सकाळी रवाना होतील. जाताना विविध ठिकाणी कार्यकर्ते त्यांचं स्वागत करणारेत. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये या सभेची तयारी सुरूये. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार? भुजबळ आणि अजित पवारांबाबत काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांचं जंगी स्वागत करणार
राज्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करावा हा आग्रह केला. त्यानुसार उद्या शनिवार म्हणजे 8 जुलैला नाशिक जिल्हयाचा दौरा जाहीर केला आहे. सकाळी 8 वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरुन शरद पवार निघतील. शरद पवार यांचं ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी यामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी जोरदार स्वागत करणार आहेत असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेष तपासे यांनी सांगितलं. 


राष्ट्रवादी काँग्रेस ही कार्यकर्त्यांची आहे. त्याचे अध्यक्ष शरद पवारसाहेब आहेत. पदावर नुसती नियुक्ती जाहीर करुन होत नसते तर त्यासाठी क्रियाशील सदस्यांची बैठक घ्यावी लागते, त्यामध्ये ठराव घ्यावा लागतो. त्यानंतरच प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होते. प्रफुल पटेल यांनी सुनील तटकरे यांची निवड केली ती स्वतः केली. त्यांची क्रियाशील सदस्यांची बैठक झाली नाही.  या ऊलट काल राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीत वर्कींग कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये 24 प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसा ठरावही झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले. 


देशपातळीवर शरद पवारांना पाठिंबा
देशपातळीवर अनेक नेत्यांनी शरद पवारसाहेब यांना पाठिंबा दिला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आता बंगळुरूमध्ये होणार्‍या विरोधी पक्षांच्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही महेश तपासे यांनी दिली. नियमबाह्य काय आहे हे जनता ठरवू दे त्यांनी सांगून काही होत नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार आहेत. 24 राज्यामध्ये पक्षाचा विस्तार आहे. अनेक ठिकाणी निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्रात काही आमदारांच्या सह्या घेऊन स्वतः ला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करु शकत नाही. केरळमध्ये आमदार आहेत तिथे सरकारमध्ये प्रतिनिधी आहेत. लक्षद्वीपमध्ये खासदार आहे. नागालँडमध्ये आमदार आहेत. या सर्वांनी शरद पवारसाहेबच राष्ट्रीय अध्यक्ष अशी घोषणा केली व तसा ठरावही केला आहे असेही महेश तपासे म्हणाले.